Priyanka Chopra Necklace : प्रियंकाच्या गळ्यात 358 कोटींचा हिरेजडीत नेकलेस; 200 कॅरेटच्या 7 हिऱ्यांचा हार

Priyanka Chopra Necklace : प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे, यावेळी चर्चेचं कारण थोडं अलिशान आहे. प्रियंका तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते यावेळी चर्चेंचं कारण मात्र कोट्यवधींचं आहे. प्रियंका चोप्रानं नेमकं काय केलंय? काय झालंय? या सगळ्यांची उत्तर या रिपोर्टमधून घेऊ.

दागिने पाहून अनेकदा प्रश्न पडतो की, त्याची किंमत नक्की किती असावी, कोट्यवधींच्या घरात असली तरी नेमकी किती असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अलिकडेच ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा बल्गेरी इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या सोहळ्यातील तिनं परिधान केलेला हिरेजडीत नेकलेस चर्चेचा विषय ठरलाय..या हाराची किंमत फक्त 358 कोटी रुपये आहे.

Laapataa Ladies Film : ‘ॲनिमल’ पेक्षा ‘लापता लेडीज’ ठरली जबरदस्त, काही दिवसातच नेटफ्लिक्सवर मिळाले मिलियन्स व्ह्यूज

बल्गेरी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रानं क्रीम अँड ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये एन्ट्री घेतली. यावेळी तिच्या गळ्यात अतिशय महागडा डायमंड नेकलेस घातलेला दिसला. हा 'बल्गेरी' ब्रँडचा सर्वात महागडा नेकपीस आहे. हिरेजडीत नेकलेस बनवण्यासाठी 2 हजार 800 तास लागले. या नेकपीसमध्ये 7 हिरे आहेत. 200 कॅरेट हिऱ्यांचा समावेश असलेला या सुंदर नेकलेसची किंमत 43 मिलियन डॉलर अर्थात 358 कोटी रुपये आहे. सध्या या महागड्या नेकलेसची तुफान चर्चा रंगली आहे.

प्रियंकाकडे अनेक महागड्या वस्तू

प्रियंका सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी एक

प्रियंका कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण

रोल्स रॉयस असणारी बॉलिवूडची पहिली अभिनेत्री

प्रियंका अनेक आलिशान घरांची मालकीण

मुंबईसह लॉस एंजेलिसमध्येही आलिशान बंगले

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या लग्नामुळेही चर्चेत आली होती. आलिशान आयुष्य जगणारी प्रियंका इतर अभिनेत्रीपेक्षा नेहमीच काहीतरी हटके करत असते आता तीनं घातलेल्या नेकलेसची चर्चा जगभर होतेय.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply