Praniti Shinde : भाजप उमेदवाराला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल; प्रणिती शिंदे थेट बोलल्या

Praniti Shinde :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकारण तापलं आहे. सोलापुरात काँग्रेस आणि भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. तसेच सभांचाही धडाका लावला आहे. अशाच एका सभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

सोलापुरात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी एका सभेत माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार घणाघात केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'मतदान कामावर केलं पाहिजे. श्रीरामावर नाही. कर्म महत्वाचे आहे, धर्म नाही. भाजपचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल. त्यांना मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं? असा प्रश्न विचारा. त्यावेळी तो खासदार तुम्हाला एक तर सुशीलकुमार शिंदेंनी काय केले असेल विचारेल'.

CSK Vs DC, IPL 2024 : गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका

सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावरही प्रणिती शिंदे यांनी टीका केली. 'सोलापूरचे खासदार संसदेत बोलले असते तर सोलापूर, अक्कलकोटला पाणी मिळाले असते. त्यामुळे जे खासदार संसदेत बोलणार नसतील तर काय उपयोग? तुमच्यासोबत धोका, विश्वासघात झाला आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप

भाजपवर गंभीर आरोप करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'भाजपला काही मुद्दे राहिली नाहीत. तेव्हा काहीतरी घडवतात. मागच्या निवडणुकीत पुलवामा घडले. त्यांचे अधिकारी म्हणाले पुलवामा घडवले. ते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा काळ देशात आणा. अन्यथा देशाची वाईट परिस्थिती होईल'.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply