Prakash Raj : ‘चांद्रयान-३’ मिशनची खिल्ली उडवल्याने साऊथ अभिनेता प्रकाश राज ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

Chandrayan 3 : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेले अभिनेते प्रकाश राज यांनी केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही मोठे नाव कमावले आहे. 'वॉन्टेड', 'सिंघम', 'दबंग २' आणि 'पोलिसगिरी' या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या आहेत. दरम्यान प्रकाश राज यांनी चांद्रयान-३ लँडिंगपूर्वी इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

देशात वेगवेगळ्या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या सुरक्षित लँडिंगसाठी विशेष प्रार्थना आणि विधी केले जात आहे. यादरम्यान प्रकाश राज यांनी ट्विटर वर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे चहा ओततानाचे एक व्यंगचित्र असलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन देखील दिलं असून यामध्ये "ब्रेकिंग न्यूज:- विक्रम लँडरकडून चंद्रावरील पहिला फोटो येत आहे. वॉव" असं म्हटलं आहे.

प्रकाश राज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात मात्र त्यांनी चांद्रयान ३ ची देखील खिल्ली उडवल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी प्रकाश राज यांच्या या ट्वीटला उत्तरे दिली आहेत.

Parbhani : कांदा निर्यात शुल्कात वाढ; केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

या पोस्टनंतर अभिनेते प्रकाश राज यांना मात्र यासाठी प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. राम नावाच्या एका युजरने इस्रो गौरवशाली भारताचे प्रतिनिधित्व करते. तुटपुंजे संसाधने आणि निराशावादी वातावरण असतानाही अनेक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. काही मोजक्याच देशांनी साध्य केले ते इस्त्रोने मिळवून दाखवलं आहे. आता जगातील काही मोजक्या संस्थामध्ये इस्रोचाही समावेश होतो. हा माणूस भारताचील सर्वात वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. ज्या राष्ट्राने त्याला खूप काही दिले त्या राष्ट्राचा तिरस्कार करतो.. असे म्हटले आहे.

अरुण विश्वनाथन या वापरकर्त्यांने, मोदींचा द्वेष करणे ही एक गोष्ट आहे, पण भारताच्या विकासाचा द्वेष करणे ही घृणास्पद गोष्ट आहे आणि केवळ प्रकाश राज यांच्यासारखे नीच प्राणीच करू शकतात! चंद्रमोहीम ही भारताची शान आहे आणि संपूर्ण देश या प्रकल्पामागे आहे, अशा देशद्रोही वगळता ज्यांना भारताचा विकास होऊ द्यायचा नाही! अशा शब्दात प्रकाश राज यांना सुनावलं आहे.

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण गेल्या १९ जुलै रोजी झाले होते. यापूर्वी २०१९ मध्ये चांद्रयान-२ लाँच करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते अयशस्वी झाले होते चांद्रयान-३ हे येत्या २३ ऑगस्ट २०२३ (बुधवार) रोजी भारतीय वेळेनुसार १८:०४ च्या सुमारास चंद्रावर उतरणार आहे.

चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी इस्त्रोकडून प्रयत्न केले जात आहेत. ही लँडिंग यसस्वी झाल्यास भारत हा युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीननंतर हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरेल. चांद्रयान-3 मोहिमेच्या लँडरला विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply