Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत याची गॅरंटी काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत याची गॅरंटी काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या नालायकपणामुळे भाजप सत्तेत आलं, अशी टीकाही त्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी राजकीय प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी देखील वंचितच्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. ते स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Maharashtra Election : हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही; शिवसेना पळवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वंचितचे जवळपास ३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. तर काही जागांवर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देखील दिला आहे. यावरुन तुम्ही विशिष्ट ठिकाणीच पाठिंबा देताय असं का? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्याचं कारण असं आहे की, ते नाहीच येत. उद्धव ठाकरे  यांचा गट स्वतंत्र राहिल आणि भाजपसोबत जाणार नाही याची काहीच गॅरंटी नाही, असं आंबेडकर म्हणाले. त्याचं कारण असं आहे की, शिवसेनेचा इतिहास आहे की ते भाजपचा भाग राहिले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply