Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट; डीआरडीओकडून झाली मोठी चूक

Pradeep Kurulkar : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) डीआरडीओ संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावलेली आहे. सध्या प्रदीप कुरुलकर यांची चौकशी सुरू असून या चौकशीत डीआरडीओकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

एटीएसने डीआरडीओकडे प्रदीप कुरुलकर यांचा लॅपटॉप तपासणीसाठी मागितला होता. त्यानंतर डीआरडीओने कुरुलकर यांचा लॅपटॉप एटीएसला दिला. मात्र, हा लॅपटॉप चुकीचा असल्याचं एटीएसने सांगितलं आहे. एटीएसने ही चूक डीआरडीओच्या लक्षात आणून दिली.

Tilari Project : गोवा आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या तिलारी प्रकल्पासाठी ३३० कोटी रुपये मंजूर, शिंदे सरकारचा निर्णय

प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची कोठडी २५ जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती.दरम्यान, तपासात कुरुलकरांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएस  न्यायालयाकडे केली.

न्यायालयाने एटीएसला कुरुलकर प्रकरणात पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणीतील फरक स्पष्ट करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे. कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविल्यानंतर त्यांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, या दृष्टीने तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply