Pune : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विभागाचीच (यूपीएससी) फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाही तिने बारा वेळा परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) पाठविलेल्या नोटिशीत समोर आली. त्याशिवाय परीक्षेसाठी त्यांनी इतर मागासवर्गासह (ओबीसी) बहुविकलांग प्रवर्गातून परीक्षा अर्ज भरला असून, वेळोवेळी आई-वडिलांच्या नावांतही बदल केला होता.
केंद्र सरकारच्या उपसचिव कविता चौहान यांनी या संदर्भात पूजा खेडकरला नुकतीच नोटीस पाठविली. ही नोटीस प्रशासनामार्फत तिच्या बाणेर येथील बंगल्याबाहेरही चिकटविण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून समन्स बजावूनही ती अद्याप पोलिसांसमोर हजर झालेली नाही. यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी किती वेळा परीक्षा देता येऊ शकते याच्या अटी आहेत. खेडकर यांची २०२२ मधील आयएएस म्हणून बहुविकलांग या प्रवर्गातील ‘पर्सन वुइथ बेंचमार्क डिसअबिलिटीज’ (पीडब्ल्यूबीडी) या विशेष उपवर्गातून निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Satara News: MBBSच्या विद्यार्थिनीचा इमारतीवरुन पडून मृत्यू; प्रकरणात बड्या व्यक्तीचं नाव? गूढ वाढलं |
पूजाच्या नावातील बदल
- पूजा खेडकर २०१२पासून परीक्षा देत होती. २०१२ ते २०१५पर्यंत तिने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने परीक्षा दिली. त्या वेळी वडिलांचे नाव ‘दिलीप कोंडिबा खेडकर’, तर आईचा उल्लेख ‘मनोरमा दिलीपराव खेडकर’ असा केला.
- सन २०१६पासून वडिलांचे नाव कायम ठेवून २०१८पर्यंत आईचे नाव ‘मनोरमा जगन्नाथ बुधवंत’ असे लिहिले.
- सन २०१९मध्ये आईचे नाव ‘मनोरमा जे. बुधवंत’ असे, तर वडिलांचे नाव ‘खेडकर दिलीपराव के.’ असे लिहिले.
- सन २०२३पर्यंत दिलेल्या विविध परीक्षांमध्ये आई-वडिलांच्या नावांमध्ये बदल केले.
- सन २०२१ ते २०२३ या दरम्यान दिलेल्या परीक्षांमध्ये ‘पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर’ असे नाव वापरले.
मसुरीच्या संस्थेकडून वर्तन अहवाल सादर
- मसुरीतील लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने घेतलेल्या फाउंडेशन कोर्स काळात पूजा खेडकरला पाच वेळा ‘मेमो’ दिला होता. इतर कारणांसाठी तीनदा मेमो देण्यात आला.
- शिस्त आणि नियमांचे पालन करण्याबाबत १५ पैकी ३.१४ इतकेच गुण मिळाले होते. एकूण प्रशिक्षण काळात २०० पैकी १०५.१३ इतके गुण मिळाले होते, अशी माहिती मसुरीच्या संस्थेने ‘यूपीएससी’ला दिल्याकडे नोटिशीत लक्ष वेधले.
पहिल्याच नियुक्तीत जिल्हाबदल
महाराष्ट्र केडरमध्ये तिचा समावेश करताना तिला प्रशिक्षणासाठी सुरुवातीला भंडारा जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी तिने पुण्याची निवड करून राज्य सरकारने ती बदलल्याची माहिती मसुरीच्या संस्थेने दिली. या दरम्यान, त्यांच्या वर्तणुकीसाठी अनेकदा समुपदेशनही करण्याची सूचना करण्यात आली होती. राज्य सरकारच्या अहवालातही खेडकर या आयएएस अधिकारी म्हणून काम करण्यास अयोग्य असल्याचे म्हटले असून, त्यांची वर्तणूक गंभीर असल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.
शहर
- SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
- Milk Tanker Accident : शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर
महाराष्ट्र
- Maharashtra Weather : थंडी गायब, हिवाळ्यात निघतोय घाम; पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, राज्यात कुठे कसं हवामान?
- Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले, म्हणाल्या...
- Badlapur Crime : मेहुण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं, ती महिला 'गायब'; वकील भावोजीचा असा झाला पर्दाफाश
- Hydrogen Train : मुंबई किंवा दिल्ली नाही तर या ठिकाणाहून धावणार सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये