Political News : मोठी बातमी! 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता', राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान

Jayant Patil : राज्याच्या राजकारणात ९ महिन्यांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मविआने सरकारला लक्ष केलं आहे. अशात संजय राऊत सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचं म्हणत आहेत. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अससल्याचं म्हटलं आहे. 

जयंत पाटील म्हणाले, 'सुप्रमी कोर्टाच्या निकालामध्ये शिंदे गटातील आमदार जर अपात्र झाले तर शिदें-फडणवीस सरकारला सत्तेत राहता येणार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे.'

जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रपती राजवटीबाबत जयंत पाटीलांनी योग्य विधान केलं आहे. सर्वकाही कायद्याने होत असेल तर १६ आमदार अपात्र ठरतील. एकनाथ शिंदेसह आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवटीवरील वक्तव्यावर जयंत पाटलांच स्पष्टीकरण

सुप्रीम कोर्टाच्या निकालात जर डिसकॉलिफिकेशन झालं तरी या सरकारला राहता येणार नाही. सरकारच जर राहिलं नाही तर दुसरा कोणता पर्याय राहील असं मला वाटत नाही. त्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं मी बोललो होतो, असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी यावर दिलं आहे. राष्ट्रपती राजवटीच्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात शिंदे-फडणवीस सरकारविषयी चर्चांना उधाण आलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply