Political News : शरद पवारांनी खूपच लवकर वेगळी भूमिका घेतली म्हणणाऱ्या अजितदादांना सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, तेव्हा...

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी वेगळी भूमिका स्वीकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान काल अजित पवारांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करत थेट शरद पवारांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. मी साठीत ही भूमिका घेतली काहींनी वयाच्या अडोतिसाव्या वर्षीच घेतली होती, अशा शब्दात अजितदादांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते...

नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ज्यांना माझ्यासोबत झोकून देऊन काम करायचे आहे, त्यांनी माझ्याकडे या, ज्यांना दुसऱ्या गटात जायचे आहे त्यांनी खुशाला जावे. पण आता कठोर भूमिका घ्यावी लागेल. मी भूमिका वयाची साठी पार झाल्यावर घेतली. काहींनी तर ३८ व्या वर्षी घेतली. वसंतदादांना डावलून निर्णय घेतला गेला, म्हणजे यापूर्वी निर्णय घेतले नाहीत, असं नाही. त्यामुळे तुम्ही पण मला समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाचा काळ असतो, जास्त वय झाल्यावर आपणही घरातल्यांना म्हणतो तुम्ही आराम करा, आशिर्वाद द्या, मार्गदर्शन करा.

Wardha Crime News : मध्यरात्रीचा थरार.. फार्म हाऊसवर दरोडा; एकावर शस्त्राने वार करत दागिने व सोयाबीनची ५५ पोते नेले लुटून

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

अजित पवार हे सध्या शरद पवारांवर थेट टीका करत आहेत, तसेच त्यांनी भाषणात शरद पवारांनी वयाच्या ३८व्या वर्षी वसंतदादांना बाजूला करत घेतलेल्या भूमिकेचा देखील उल्लेख केला. याबद्दल विचारण्यात आल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या दोन्ही दोन्ही गोष्टीत थोडासा फरक आहे.

३८व्या वर्षी जेव्हा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. ती वेगळी चूल मांडताना काँग्रेसमधील अनेक लोकं त्यांच्यासोबत होते. पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. शालीनीताई पाटील यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाल मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. कोण निवडून जाणार ही जनता ठरवते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार हे सातत्याने शरद पवारांनी पुन्हा विचार केला पाहिजे असे अवाहन करत आहेत, त्यांना शरद पवारांची खरंच भीती वाटतेय का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की,शरद पवार यांच्यावर टीका केली की गेले साठ वर्ष हेडलाईन होतेच. त्यामुळे त्यातकाही गैर नाहीये.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply