Political News : प्रकाश आंबेडकरांच्या नव्या मागणीने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार? आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

 

 

Political News : महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु केली आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला सुरु आहे. मात्र या बैठकांमधून अद्यापही ठोस निर्णय समोर आलेला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने सम-समान जागावाटपाचा फॉर्म्युला समोर ठेवला आहे. त्यातही आता महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईत देखील पण 2 जागेची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या 30 जानेवारी रोजी महविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. 

Raj Thackeray : राज्यातील सर्वच शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी सक्ती करा; राज ठाकरे विश्व मराठी संमेलनातून गरजले

मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा या दोन मतदारसंघांची मागणी वंचित करणार असल्याची शक्यता आहे. आज वंचितचे नेते सुजात आंबेडकर दोन्ही मतदारसंघांचा दौरा करणार आहे. 

वंचितच्या नवीन मागणीमुळे इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी ठाकरे गट मुंबईत 4 जागेवर लढण्याच्या तयारीत तर काँगेस पण मुंबईत 3 जागेवर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एका जागेची मागणी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापतरी दिसत नाही.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply