Political News : सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर; खुद्द शिंदेंकडूनच गौप्यस्फोट

Political News :  राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे  यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा,' दावा शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलहे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार असून, त्यापूर्वी शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

नेमकं काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? 

अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, 'माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, 'लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 

Nandurbar Zp News : जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया रखडली; संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन

सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये आल्यास स्वागत करू : गिरीश महाजन

दरम्यान यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "अनेक लोकांच्या मनात आहे की, भाजपशिवाय पर्याय नाही. सर्व देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. अनेक लोकांना वाटत आहे की, काँग्रेसमध्ये भवितव्य नाही. त्यामुळे आपला आणि आपल्या पुढच्या पिढीबद्दल असे वाटणे सहाजिक आहे. पण, त्यांना भाजपमध्ये या असे कोण म्हणाले याचा त्यांनी खुलासा केला नाही. पण अनेक लोकं आम्हाला म्हणत आहे की, आमचा विचार करा. त्यामुळे, आगामी काळात आणखी मोठे राजकीय भूकंप महाराष्ट्रातील राजकारणात होणार आहेत. सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांचे आम्ही स्वागत करण्यास सकारात्मक आहोत. त्यांना आमच्या पक्षात घेण्यात आम्ही नाही म्हणालो नाही आणि आम्हाला कोणतेही अडचण नसल्याचे देखील महाजन म्हणाले आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply