Political News : पुण्याचे पालकमंत्रिपद देणे म्हणजे मोठ्या कामासाठी छोटी तडजोड; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

Political News : भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बैठकीला पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी बारामती जिंकली नाही तर पुन्हा कधीच संधी नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

भाजपने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात कमळ फुलवायचं ठरवलं आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारी देखील सुरु केली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज पहिलाच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे.

Narendra Modi In P20 Summit : दहशतवादाविरुद्ध कठोर व्हायला हवं! PM मोदींनी अख्ख्या जगाला निक्षून सांगितलं

यावेळी झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद देणे ही मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड आहे. बारामती यावेळी जिंकली नाही तर पुन्हा कधीच संधी नाही. 

माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रिपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही. पालकमंत्री पद देणे, ही एक छोटीशी तडजोड आहे. बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

मात्र यावेळी बारामती लोकसभा जिंकली‌ नाही तर पुन्हा कधीच जिंकणार नाही. त्यामुळे मतभेद, वाद बाजूला ठेवून कामाला लागा, अशा‌ सूचना चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply