Political News : शरद पवार गटाला दणका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास सुखद धक्का;जाणून घ्या काय घडलं कोकणात?

Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साेडचिठ्ठी दिली. मयेकर यांनी आज (बुधवार) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. मला काेणत्याही पदाची अपेक्षा नसून आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी निश्चित पार पाडणार असे मयेकर यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच उमेदवारानं आज शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या शिवसेनेत झालेल्या प्रवेशामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला माेठा धक्का मानला जात आहे.

Navi Mumbai Crime News : सोशल मीडियावर ओळख.. प्रेम.. संशय... अन् हत्या; बँक मॅनेजर तरुणीचा प्रियकराकडून लॉजमध्ये खून

सन 2019 मध्ये सुदेश मयेकर यांनी 32 हजार मतं सामंत यांच्या विरोधात मिळवली होती. त्याच सुदेश मयेकर यांनी आता उदय सामंत यांना साथ दिली आहे. सुदेश मयेकर यांनी रत्नागिरीचे नगराध्यक्ष पद देखील भूषविले आहे. उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी सामंत कुटुंबियांच्या समक्ष मयेकर यांनी सेनेत प्रवेश केला.

दरम्यान स्थानिक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत माझे विचार जुळले नाहीत. तसेच अडचणींच्या काळात सामंत कुटुंबियांना मला दिलेला आधार हे देखील शिवसेनेत प्रवेश करण्याचे कारण असल्याचे मयेकर यांनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply