Political News : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टास सुरु असलेली सुनावणी संपली आहे. सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सलग तीन दिवसांनंतर दोन्ही बाजूंचा कोर्टातील युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

आता प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सातत्याने अशी मागणी केली आहे. आज सुनावणी सुरू झाल्यानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलत सुनावणी सुरू ठेवली. अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे. निकालाची तारीख मात्र कोर्टाने जाहीर केलेली नाही. 

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवल्याने प्रकरण ७ जणांच्या खंडपीठाकडे जाणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply