Police Recruitment : मराठा आरक्षणासाठी पोलीस भरतीच्या नोंदणीला मुदत वाढ; १५ एप्रिलपर्यंत करता येतील अर्ज

Police Recruitment : राज्यात होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी अद्याप ज्यांनी अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. मराठा समाजाच्या युवकांनी आरक्षणाचा लाभ मिळावा व कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने  ही मुदत वाढ दिली असल्याने यामुळे दिलासा मिळणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ जागेवर पोलीस भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात येणार होती. मात्र, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी कागदपत्र अपलोड करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याची निदर्शनास आणून दिले होते. शिवाय मराठा आरक्षण विधेयक संमत करण्यात आले असून नव्या आदेशानुसार सर्वच भरती प्रक्रियेत त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदन देत या मुदतवाढीची मागणी केली होती.

 

मुदत वाढल्याने संधी

पोलीस  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यासाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मार्च हि अंतिम मुदत होती. मात्र यासाठीची मुदत पंधरा दिवसांनी वाढविल्याने ज्यांचे अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या त्यांना हि चांगली संधी मिळाली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply