Police Patil Bharti : 'पोलीस पाटील भरतीमध्ये मोठा घोळ'; चौकशी होत नसल्याने अपात्र उमेदवारांकडून आमरण उपोषणाला सुरूवात

Police Patil Bharti : गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पोलीस पाटील भरतीबाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलीस पाटील भरतीमध्ये मोठा घोळ झाला आहे, असा आरोप अपात्र उमेदवारांनी केलाय. आरोप करत उमेदवारांनी या विरोधात आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

या परीक्षेवरून सुरुवातीला उमेदवारांनी सीसीटीव्ही फुटेज आणि लेखी परीक्षेच्या गुणांची तपासणी करण्याबाबत निवेदन दिले होते. तेव्हा केलेल्या आंदोलनाची दखल उपविभागीय अधिकारींनी घेतली होती. तसेच मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Nitesh Rane : प्रकाश आंबेडकर सावध व्हा ! ज्या जागा तुम्ही जिंकू शकत नाही, मविआ तुम्हांला देत आहे : नितेश राणे

परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्याने अर्जुनी मोरगाव आणि इतर पोलीस पाटील भरतीतील उमेदवारांनी घोळ झाल्याचा आरोप केला. तसेच आता देखील मागणी मान्य होत नसल्याने उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे. या भरतीची निष्पक्षच तपासणी करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

पोलीस पाटील भरतीमध्ये पात्र उमेदवार मेहनतीने नाही तर पैसे भरून पास झाले आहेत, असा आरोप करण्यात आलाय. पैसे भरलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्यावेळी विशिष्ट रंगाचे कपडे घालण्यास सांगण्यात आले होते, असाही आरोप अपात्र उमेदवारांनी केला आहे. आता जिल्हा प्रशासन याकडे कशाप्रकारे बघते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply