Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Navi Mumbai : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उलवे येथे राहणाऱ्या एका पोलीस शिपायाने घरात गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले. घरी झालेल्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची नोंद उलवे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी शिपाई घरी एकटाच होता.

गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव स्वप्निल लोहार असे आहे. ते उलवे येथील रहिवासी होते. नवी मुंबईमधील सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लोहार कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर स्वप्निल लोहार यांनी आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेच्या वेळी स्वप्निल लोहार हे घरी एकटे होते. लोहार यांचे त्यांच्या पत्नीसोबत फोनवर बोलणे झाले. फोनवर बोलत असताना त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले जात आहे. या प्रकरणी उलवे पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आली आहे. तसेच तपास देखील सुरु करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *