PMPML Bus : पीएमपीएमएल चालकांवर कठोर कारवाई, बस चालवताना मोबाईल वापर आणि तंबाखू सेवन केल्यास होणार निलंबन

PMPML Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या एका चालकाला बस चालवताना आयपीएल सामना पाहिल्यामुळे निलंबित करण्यात आले. या घटनेनंतर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कामकाजी वेळेत कोणत्याही प्रकारची असंवेदनशील किंवा निष्काळजी वर्तणूक दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच कडेकोट नियम लागू केले आहेत.

पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. त्यांच्या चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते. पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

Pune News : मित्रासोबत पोहायला गेला, पाण्याचा अंदाज आला नाही, १४ वर्षाच्या मुलाचा ३ दिवसांनी मृतदेह सापडला

यापूर्वीही, पीएमपीएमएलने त्यांच्या चालकांना आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्याचे कडक निर्देश जारी केले होते. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोन महिन्यांचे निलंबन केले जाईल परिपत्रकात म्हटले होते.

सध्या पीएमपीएमएलकडे ९४०० चालक कर्मचारी आहेत, ज्यात ४४०० कंत्राटी चालकांचा समावेश आहे. आता पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी तक्रारींचे फोटो/व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ पीएमपीएमएलच्या ईमेल complaints@pmpml.org, व्हॉट्सअॅप क्रमांक 9881495589 वर पाठवण्याची विनंती केली आहे किंवा पीएमपीएमएलच्या जवळच्या डेपोमध्येही पुराव्यासह तक्रारी सादर केल्या जाऊ शकतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply