PMC Recruitment : पुणे पालिकेच्या शाळेत शिक्षक होण्याची संधी; करार पद्धतीने होणार भरती

पुणे - पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला असताना प्रशासन अखेर जागे झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केली जाईल. याची प्रक्रिया पूर्ण झाली असून इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी १९५, तर मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांसाठी १३४ शिक्षक घेण्यात आले आहेत.

शहरातील २८४ शाळांमध्ये ९३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण शिक्षक नसल्याने इंग्रजी व मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विषयनिहाय शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकाच शिक्षकावर जास्त भार पडतो.

याशिवाय एका शिक्षकास अनेक विषय शिकवावे लागतात. शिक्षकांच्या महापालिकेच्या जुन्या हद्दीतील ३१७ आणि समाविष्ट गावांतील ३५० अशा ७२७ जागा रिक्त आहेत. त्यापैकी आंतरजिल्हा बदलीतून २१९ शिक्षक मिळणार आहेत. त्यामुळे ५०८ जागा रिक्त आहेत

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन चालू शैक्षणिक वर्षासाठी सहा महिन्‍यांच्या करारपद्धतीने शिक्षक नेमेल. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २६० शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यांना दरमहा २० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

२६० जागांपैकी १९५ शिक्षकांची भरती केली आहे. मराठी माध्यमासाठी विज्ञान, गणित, इंग्रजी, इतिहास भूगोल यांसह इतर विषयांचे १३४ शिक्षक नियुक्त केले आहेत. त्यांच्या निवडीस आयुक्त विक्रम कुमार यांनी अंतिम मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या शाळेसाठी कायम शिक्षण मिळण्यास वेळ लागणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांत सहा महिन्यांसाठी करारपद्धतीने शिक्षक तात्पुरते घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर होता. त्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक उपलब्ध होतील.

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply