
Khadakwasla : शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट (प्रभाग क्र. ३३) मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात चारही जागांसाठी झालेली अटीतटीची लढत अखेर संमिश्र भावनांत संपली. अ आणि क या दोन जागांवर भाजपने विजय मिळवला, तर ब आणि ड या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पारड्यात पडल्या. निकाल जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या गोटात आनंद आणि दुःख यांची सरमिसळ पाहायला मिळाली. दोन जागांच्या विजयामुळे जल्लोष झाला, तर हातातून निसटलेल्या दोन जागांमुळे अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
हा प्रभाग नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा असून, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला येथे अनुकूल वातावरण होते. शिवणे, उत्तमनगर व कोंढवे कोपरे परिसरात झालेल्या मागील जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला, तर पंचायत समितीसाठी भाजपला संधी मिळाली होती. तसेच खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड आणि धायरी परिसर भाजप व शिवसेनेला अनुकूल ठरला होता. त्यामुळे यावेळी लढत चुरशीची होणार आणि निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत अनिश्चितता होती. पॅनेल-टू-पॅनेल मतदान होणार नाही, अशीच चर्चा होती आणि प्रत्यक्षात तसेच घडले. गावं महापालिकेत समाविष्ट झाली असली, तरी मतदारांनी गावाशी नातेसंबंध असलेल्या उमेदवारांनाच पसंती दिल्याचे चित्र स्पष्ट झाले.
|
Pune Mayor : पुण्याचा पुढचा महापौर कोण? ‘ही’ नावे आघाडीवर; भाजपची रणनीती काय असेल? |
'अ' गटातून भाजपच्या धनश्री दत्तात्रय कोल्हे विजयी झाल्या. त्या खडकवासला मतदारसंघातील भाजप महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. त्यांचे पती दत्तात्रय भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. त्यांचे दीर विजय कोल्हे हे खडकवासल्याचे माजी सरपंच होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणामुळे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. त्यांच्या उमेदवारीसाठी आमदार भीमराव तापकीर यांनी आग्रह धरला होता. या गटात त्यांना सर्वाधिक ३२ हजार ६८५ मते मिळाली. त्यांच्या विरोधात भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात गेलेल्या घुले यांनी निवडणूक लढवली होती. कोल्हे यांनी ४,८८७ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवले.
'ब' गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अनिता इंगळे विजयी झाल्या. त्यांनी २००७ मध्ये काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्य म्हणून, तर २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. यावेळी थेट महापालिकेची निवडणूक जिंकत त्यांनी तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. त्यांची मुदत २०२२ मध्ये संपली असली, तरी त्या सातत्याने नागरिकांच्या संपर्कात होत्या. त्यांच्या विरोधात भाजपच्या ममता सचिन दांगट यांनी निवडणूक लढवली. या दोघींमध्ये २०१७ मध्येही थेट सामना झाला होता. दांगट यांचे पती प्रभाग समितीचे स्वीकृत सदस्य होते. इंगळे यांनी ७,७६४ मतांचे मताधिक्य मिळवले.
'क' गटातून भाजपचे सुभाष नाणेकर विजयी झाले. त्यांच्या उमेदवारीसाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आग्रह धरला होता. नाणेकर यांच्या पत्नी २०१७ मध्ये पंचायत समिती सदस्य होत्या, तर स्वतः नाणेकर उत्तमनगर ग्रामपंचायतीचे सरपंच होते. संदीप मते हे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व उपसरपंच होते. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि ठाकरे गटात युती न झाल्याने मते यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नाणेकर यांना अवघ्या ५३९ मतांनी विजय मिळाला. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राहुल पोकळे यांनी अपक्ष निवडणूक लढवून नऊ हजार मते घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल घुले यांनी शिवसेना (उबाठा) कडून निवडणूक लढवत ३,७१५ मते मिळवली. या दोघांची मते एकत्र केल्यास १२ हजारांहून अधिक होत असल्याने राष्ट्रवादीचे संदीप मते यांचा निसटता पराभव झाला.
'ड' गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सोपान (काका) चव्हाण विजयी झाले. चव्हाण आणि त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार किशोर पोकळे हे दोघेही धायरीतीलच असल्याने परिसरात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पोकळे यांच्या पत्नी अश्विनी पोकळे या यापूर्वी अकरा गावांच्या नगरसेविका होत्या. चव्हाण यांनी ३,३५० मतांचे मताधिक्य मिळवले.
चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ते असून, त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. २००२ मध्ये ते नगरसेवक झाले होते. २००७ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली; मात्र त्यात अपयश आले. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा त्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली. २००९ पासून गेल्या चार पंचवार्षिक कालावधीत ते विधानसभेसाठी इच्छुक होते; मात्र संधी मिळाली नव्हती. तरीही त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत सातत्याने पक्षबांधणी केली. अखेर २४ वर्षांनंतर त्यांच्या संयमाला यश मिळाले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- Pune : पुणे महापालिका मतदानात गोंधळ! मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना; मतदार चक्रावले
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू”