PM Narendra Modi : स्वातंत्र्यदिनी OBC बांधवांना मोठं गिफ्ट; PM मोदींनी केली विश्वकर्मा योजनेची घोषणा

Independece Day : देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन केले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या घोषणाही केल्या.

लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. 'ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू होणार आहे. या योजनेचा फायदा अनेकांना होईल. देशातील योजनांचा फायदा लाखों लोकांना झाला आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल... अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक साह्य केलं जाणार आहे. लोहार, सुतार, कुंभार अशा विश्वकर्मांसाठी ही योजना राहणार आहे. विश्वकर्मा समाजाअंतर्गत १४० जाती येतात.

Himachal Pradesh Rain : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 50 जणांचा मृत्यू, 40 जण मलब्याखाली दबल्याचा अंदाज

महिला शक्तीचा केला जागर...

"भारत महिलांच्या नेतृत्वाखाली विकास पाहत आहोत. आपण प्रादेशिक आकांक्षांचा आदर केला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना संबोधित केले पाहिजे, भारत लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल आहे. मी जेव्हा ऐक्याबद्दल बोलतो तेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार होत असेल तर महाराष्ट्रात वेदना जाणवतात.. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआपल्या भाषणातून नारी शक्तीचा जागर केला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply