PM Narendra Modi on Russia Ukraine War : PM मोदींच्या हस्तक्षेपामुळे रशिया-युक्रेनमधील अणुयुद्ध टळलं; अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

PM Narendra Modi on Russia Ukraine War :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रशिया आणि युक्रेनमधील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका अहवालातून केला आहे. जगावरील एक मोठी आपत्ती रोखण्यात पंतप्रधान मोदी यांची मोठी भूमिका आहे, असंही त्यांनी आपल्या दाव्यात म्हटलं आहे. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये दोन्ही देशांमधील संघर्ष अचानक उफाळून आला यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले देखील करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला.

Rohit Pawar : कारखान्यावर राजकीय द्वेषातून ईडीची कारवाई; जप्तीच्या अ‍ॅक्शननंतर रोहित पवार यांचा हल्लाबोल

दोन बलाढ्य देशामधील हे युद्ध आण्विक संघर्षाकडे जात असल्याच्या अनेक बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे भारतासह इतर देशांनी मध्यस्थी करत रशिया-युक्रेनला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाने आपल्या आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांना कडक शब्दात इशारा दिला होता.

इतकंच नाही, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आण्विक हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. अशातच जगातील मोठ्या नेत्यांनी रशिया-युक्रेन संघर्ष रोखण्यास उल्लेखनीय भूमिका बजावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचे नाव आघाडीवर होते, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

सीएनएनने रविवारी  हा दावा एका वृत्तात प्रसिद्ध केला. त्यानुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर आण्विक हल्ला करण्यापासून रोखले. मोदींनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जगावरील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply