PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराच्या स्वरूपात ‘केसरी’चा पहिला अंक, पुणेरी पगडी व टिळकांसारखं उपरणं,

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दीपक टिळक यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त होताच मोदींनी टिळकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानले. दरम्यान, या पुरस्कारात मिळणारी रोख रक्कम 'नमामि गंगे'ला देणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं.

पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांची उपस्थिती होती.

PM Modi Meets Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; व्यासपीठावर रंगला हास्यविनोद

PM मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार का दिला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या पुरस्काराची निवड करण्याबाबत सांगताना, दीपक टिळक म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र, आधुनिक, बलाढ्य हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं होतं. राष्ट्रीयत्व, हिंदुस्तानची पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितलं होतं.

तेच सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्राच्या मागे आहे. त्यामुळे आमच्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण हे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे, असं दीपक टिळक यांनी सांगितलं.

टिळक पुरस्काराचं स्वरुप काय?

लोकमान्य टिळक स्मारक ट्र्स्टच्या वतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो.लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. दरम्यान, पुरस्कार प्राप्त होताच पंतप्रधान मोदी यांनी यातील १ लाखांची रक्कम 'नमामी गंगे' या गंगा नदी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी देणार असल्याचं जाहीर केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply