PM Narendra Modi : रामभूमीतून फुटणार भाजपच्या प्रचाराचा नारळ; नववर्षाच्या सुरूवातीलाच PM मोदींचा नाशिक दौरा

PM Narendra Modi : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या यामहोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या सोबतच आगामी लोकसभेच्या प्रचाराचा नारळही फुटणार असल्याची माहिती आहे.

आगामी लोकसभा निवडणूकांचे  सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. या निवडणूकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघावर भाजपने  लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच रामभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधून लोकसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

Educational Breaking News : MPhilला मान्यता नाही! ताबडतोब प्रवेश देणं थांबवा; UGCचे विद्यापीठांना महत्वाचे निर्देश

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. भाजपचे सर्व नेते आणि मंत्री या सभेला हजर राहणार असून या निमित्ताने लोकसभा निवडणूकांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो तसेच विराट सभाही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या राष्ट्रीय महोत्सवाला १० ते १२ हजार युवकांची उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली जात आहे. त्यासाठी केंद्रीय पथक नाशिकम ध्येदाखल झाले आहे. तसेच येत्या २ ते ३ दिवसात याच्या तयारी संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकही घेतली जाणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply