PM Modi : 'विक्रम लँडर उतरलेल्या जागेला 'शिवशक्ती' नाव...' पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 'चांद्रयान २' चे 'तिरंगा' असे नामकरण

PM Modi : दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मायदेशी परतले. त्यांनी ग्रीसहून थेट बेंगळुरूमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचून चांद्रयान-३  मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

"मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन तुमच्याकडे लागून राहिलेले होते. तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक होतो. इस्रो सेंटरमध्ये आल्यावर मला वेगळाच आनंद वाटत आहे. भारतात येऊन लवकरात लवकर तुमचं दर्शन घ्यायचं होते. तुम्हा सर्वांना मी सॅल्यूट करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : 'जय विज्ञान, जय अनुसंधान! ग्रीस दौऱ्यावरुन PM मोदी थेट बंगळुरूमध्ये दाखल; इस्रोच्या वैज्ञानिकांची घेतली भेट

शिवशक्ती नाव...

ज्या स्थानावर चंद्रयान -3 चे मून लँडर उतरले आहे. त्या पॉईंटला शिवशक्ती या नावाने ओळखलं जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच चंद्रयान-2 ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली.

"तुम्ही ही चांद्रयान मोहीम यशस्वी केली ही साधी गोष्ट नाही. तुम्ही चंद्रयान मोहीम यशस्वी केली ही साधी गोष्ट नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. भारत आज चंद्रावर आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. हा आपल्या देशासाठी गौरवाचा क्षण आहे. जिथे कोणीच गेले नाही तिथे आपण पोहोचलो आहोत. कुणी केले नाही केलं ते आपण केलं. हा आजचा भारत आहे, निर्भिड भारत. नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा हा भारत आहे.." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply