PM Modi Nagpur Visit : वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत मोदींच्या नागपूर दौऱ्याला सुरूवात; आज होणार समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहे.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याआधी सकाळी ९ः३० वाजता नागपुरात आल्यावर पंतप्रधान मोदींनी नागपूर रेल्वे स्थानकावर जाऊन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातील नागपूर विमानतळ येथे दाखल झाले, त्यानंतर विमानतळाच्या गेटमधून हॉटेल प्राईड मार्गे नागपूर रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. याठिकाणी पोहोचत त्यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागपूरच्या चौका-चौकात नागरिकांची मोठी गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहान मुले, महिला, नागरिक होते. 

पंतप्रधान मोदी सकाळी ९ः३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. १० वाजता, पंतप्रधान मोदींनी फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत  मेट्रोमधून प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासानंतर ते ‘नागपूर मेट्रो टप्पा एक’ राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -दोन’ ची पायाभरणीही करतील. 

तसेच सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूरचे राष्ट्रार्पण होणार आहे. सकाळी 11:30 वाजता 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था , चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्रचे लोकार्पण. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply