PM Modi in Nashik : 'शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील; पीएम मोदींनी ठाकरे गटाला डिवचलं

PM Modi in Nashik : 'महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची नाशिकमध्ये जंगी प्रचारसभा होत आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ठाकरे गटाला डिवचलं.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील भाषणाचे मुद्दे

काल काशीमध्ये बाबा विश्वनाथ आणि कालभैरव यांना नमन करत उमेदवारी अर्ज भरला. आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना प्रणाम करतो. तुमची सेवा करणे हेच माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे.

Yavatmal News : शालेय पोषण आहार की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये आढळल्या चक्क अळ्या

तुम्ही मागील १० वर्षातील काम पाहिलं आहे. आता तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद घ्यायला आलो आहे.इंडिया आघाडीतील काँग्रेस हरू लागली आहे. आता त्यांना विरोधी पक्ष होणेही अवघड झालं आहे.

यामुळे इंडिया आघाडीचे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने त्यांनी सर्व छोट्या पक्षांना सल्ला दिला आहे की, निवडणूक झाल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे. त्यांना वाटतं की, सर्व दुकाने एकत्र झाली तर देशात काँग्रेस विरोधी पक्ष होईल.

नकली शिवसेना  आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलीन होणे निश्चित आहे. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येईल.

बाळासाहेब म्हणायचे की, जेव्हा शिवसेना काँग्रेस होईल, तेव्हा शिवसेना संपवेल. त्यामुळे आता शिवसेना नामशेष होईल. जो विनाश होत आहे, ते पाहून बाळासाहेबांना मोठं दु:ख होत असेल.

आता एनडीएला मोठा विजय मिळणार आहे. याची प्रचिती इंडिया आघाडीच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे येते

बाळासाहेबांचं स्वप्न होतं की, अयोध्येत राम मंदिर व्हावं. जम्मू-कश्मीरमधून ३७० कलम रद्द होवो. मात्र, यामुळे नकली शिवसेनेला अधिक राग येत आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला धुडकावलं. नकली शिवसेनेही तोच मार्ग स्वीकारला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply