PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

कर्नाटकातील हसनचे खासदार आणि जेडी(एस)चे प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला केला.

जिल्ह्यातील सेदाम येथे काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना प्रियंका यांनी, प्रज्वल रेवन्नाला परदेशात पळून जाण्याची परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात.

मात्र ऑलिम्पिक खेळाडूंवर लैंगिक छळाच्या घटना घडत असताना ते गप्प राहिले. आता मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार केला आहे. त्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे. प्रज्वल रेवन्ना आता देश सोडून पळून गेला असला तरी मोदींना त्याची माहिती नाही. त्यामुळे आरोपी भारतात परत येईपर्यंत महिलांनी याबाबत मोदींना प्रश्न विचारावेत," असे त्यांनी प्रियंका यांनी म्हटले.

IPL 2024 Pat Cummins : धावांचा पाठलाग करणे शिकावे लागेल ; सलग दोन पराभवानंतर हैदराबाद कर्णधार कमिंसची कबुली

मोदींना अहंकारी पंतप्रधान म्हणत प्रियंका म्हणाल्या की, "ते विकासाच्या मुद्द्यावर सोडून हिंदू आणि मुस्लिमांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. गेल्या एका दशकात बेरोजगारीची समस्या वाढली आहे. विमानतळ आणि बंदरांसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रमांचे खाजगीकरण केले जात आहे. यामुळे कलबुर्गी जिल्ह्यातील लोक देहली, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.”

“पंतप्रधानांनी नेहमीच शेतकऱ्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात ते अपयशी ठरले आहेत. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. लोकशाही कमकुवत करून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. पण काँग्रेस शेतमालाला जीएसटीमुक्त करण्याबरोबरच भूमिहीन मजुरांना जमीन देईल,” असे प्रियंका म्हणाल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply