PM Modi : ते व्हीलचेअरवर बसून संसदेत यायचे...;पंतप्रधान मोदींनी दिला मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा

PM Modi : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. त्यांनी देशासाठी अनेक कामे केली आहेत. मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री, आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा अनेक पदांवर काम केले आहे. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लाईव्ह येत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. अर्थमंत्री असताना त्यांनी देशासाठी अनेक मोठी कामे केली. प्रधानमंत्री असताना त्यांनी देशाच्या विकासासाठी अनेक कामे केली. देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.

त्यांची आठवण सदैव आपल्यासोबत असेल. देशाच्या विकासासाठी त्यांचे जे काम होते त्याला खूप सन्मानपूर्वक पाहिले जाईल. त्यांचे जीवन इमानदारी आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते. ते विलक्षण खासदार होते. त्यांची विनम्रता, बौधिकता त्यांच्या संसदेतील जीवनाची ओळख आहे. ते त्यांच्या साधेपणामुळे नेहमी ओळखले जायचे.

Wardha Liquor Ban : वर्षभरात दारू विक्रीचे सात हजारांवर गुन्हे; दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील वास्तव

जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपला तेव्हा मी म्हणालो होतो की, त्यांची संसदेसाठी असलेली निष्ठा ही प्रेरणादायी आहे. संसदेत काहीवेळा ते व्हीलचेअरवर बसून येत होते.स्वतः चे संसदीय दायित्व पार पाडत होते. त्यांनी देशाच्या खूप मोठ्या पदावर काम केले आहे. तरीही ते नेहमी सामान्य मुल्यांना विसरले नाही. त्यांनी नेहमी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीशी संपर्क ठेवला. प्रत्येकाशी संवाद ठेवला. त्यांच्याशी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा व्हायची.

दिल्लीला आल्यावरदेखील माझा त्यांच्याशी संपर्क होता.त्यांच्या वाढदिवशीदेखील माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. आजच्या या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आज मी संपूर्ण देशवासियांच्या वतीने डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply