PM Modi : मुस्लिमांच्या 77 जातींना सगळीकडे मलाई मिळत होती, पण...; पंतप्रधान मोदींचे आरक्षणावर भाष्य

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एका सभेमध्ये बोलताना ओबीसीच्या आरक्षणावरुन काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बंगालमध्ये या लोकांनी ओबीसींचे आरक्षण हिसकावलं आणि ते मुस्लिमांना दिलं, पण कोलकाता हायकोर्टाने यावर स्थगिती आणली, असं ते म्हणाले आहेत.

इंडिया आघाडीचा प्लॅन काय सुरु आहे हे तुम्हाला पश्चिम बंगालमधील उदाहरणावरुन लक्षात येईल. दोन दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टाने ७७ मुस्लिम जातींचे आरक्षण रद्द केले आहे. या मुस्लिम जातींना नोकरी आणि प्रत्येक ठिकाणी मलाई मिळत होती, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. शिमलामधील एका सभेला ते संबोधित करत होते.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दिलासा; मतदानाची आकडेवारी ४८ तासात जाहीर करण्याचे आदेश देण्यास नकार

मुस्लिमांच्या अनेक जातींना इंडिया आघाडीने ओबीसी बनवलं होतं आणि त्यांना ओबीसींचा हक्क दिला जात होता. असं करुन इंडिया आघाडीने ओबीसींच्या हक्कावर धाड टाकली आणि संविधानाचे उल्लंघन केले, असं मोदी म्हणाले आहेत. मोदी यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर देखील टीकेचा बाण सोडला.

मोदी म्हणाले की, 'कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीचे लोक गोंधळात पडले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर थेट कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात की त्यांच्या लेखी संविधान आणि कोर्टाची काही किंमत नाही. त्यांना फक्त वोटबँक हवा आहे.'

२२ मे २०२४ रोजी कोलकाता हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. याअंतर्गत कोर्टाने अनेक जातींना देण्यात आलेले ओबीसी आरक्षण रद्द केले होते. या मुद्द्यावरुन भाजपने ममता सरकावर टीका केली आहे. मात्र, ममता यांनी कोर्टाचा आदेश नाकारला आहे. त्या म्हणाल्या की, मी कोलकाता हायकोर्टाचा हा निर्णय मान्य करणार नाही. काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने सरकारी शाळेतील जवळपास २६ हजार नोकऱ्या रद्द केल्या होत्या. तो आदेश पण मी मानला नव्हता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply