PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!

PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान PM मोदी यांच्या संन्मानांचा धडाका लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी त्यांना 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.

यानंतर आता लगेचच पापुआ न्यू गिनीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना पॅसिफिक बेटांच्या देशांच्या एकतेसाठी आणि ग्लोबल साउथचे नेतृत्व केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' हा पुरस्कार प्रदान केला. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे.

याआधी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. जेम्स मारापे हे नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडल्याची चर्चा सगळीकडे होत आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply