Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय; पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची कारवाई

Pimpri Chinchwad News : पिंपरी- चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या माहितीवरून स्पा सेंटरमध्ये चालणारा वेश्या व्यवसाय उध्वस्त केला आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.  तर या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गेरा इंपिरियम राईस या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर ब्रिथ स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविण्यात येत होता. भरवस्तीत चालविणाऱ्या या वेश्या व्यवसायाबाबतची गोपनीय माहिती  पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला  मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी येथे गैरप्रकार सुरु असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.  

Maharashtra Politics 2024 : त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा; महाविकास आघाडीवर CM एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

दोघे ताब्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पा सेंटरचा मॅनेजर पवन बाळासाहेब वनवे तसेच स्पा सेंटरचा मालक दीपक ज्योतिराम कोल्हापूरकर या दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्पा सेंटरमध्ये देह विक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply