Pimpri Chinchwad News : २० लाख किंमतीचा गांजा जप्त; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

Pimpri Chinchwad News : मोकळ्या जागेवर गांजा व चरस विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने कारवाई केली आहे. सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या या कारवाईत जवळपास २० लाख रुपये किमतीचा ७ किलो २०० ग्रॅम गांजा व १७५ ग्राम चरस जप्त केला आहे.

सांगली पोलीस  स्टेशन हद्दीतील स्मशानभूमीच्या समोर असलेल्या एसटी कॉलनीच्या ग्राउंडच्या कोपऱ्यावर काही इसम गांजा आणि चरस विक्री करत आहेत. अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत जवळपास तीन लाख ६० हजार रुपये किमतीचा ७ किलो ३०० ग्रॅम गांजा आणि ४ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचा १७५ ग्रॅम चरस आणि १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १२ एलएसडी डॉट पेपर, ६ मोबाईल फोन, एक कार, ३ दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहेत. 

Lok Sabha Election : शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू? १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

५ जणांना घेतले ताब्यात 

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने ओमकार उर्फ सोन्या महादेव लिंगे, अनिकेत अनिल गोडांबे, रोहन उत्तम कांबळे, रुपेश गौतम जाधव आणि रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply