Pimpri Chinchwad : अधिकाऱ्याची गाडी दिली पेटवून; चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील प्रकार

Pimpri Chinchwad : विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरु आहे. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची आज माघारीचा दिवस होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात वर्दळ होती. दरम्यान चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एका अधिकाऱ्याची चारचाकी वाहन एका दिव्यांग व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे. 

सदरच्या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. थेरगाव येथील पिपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय आहे. त्या ठिकाणी सध्या चिंचवड विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. याच ठिकाणी चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे देखील कार्यालय आहे. त्याच कार्यालयात अगदी काही मिनिटापूर्वी एका दिव्यांग व्यक्तीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका अधिकाऱ्याची चार चाकी वाहनाला आग लावून पेटवून दिला आहे. 

Dr.Ajit Ranade : गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; तात्काळ कुलगुरू पद सोडण्याचा निर्णय

विधानसभा निवडणुकीची सध्या वर्दळ सुरु आहे. अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात माघार घेणाऱ्यांची वर्दळ होती. याच वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सुदैवाने यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोणतेही कर्मचारी जखमी झालं नाही आहे. वाहन पेटवून देणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply