पिंपरी-चिंचवड: रस्त्यावर कचरा टाकाल तर खबरदार, ५० हजार रुपये दंड भरावा लागणार

पिंपरी-चिंचवड : कचरा ही एक सामाजिक समस्या आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याचे अनेक दुष्परिणाम असतात, या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आपण निमंत्रण देत असतो. त्यामुळे प्रशासनान सतत नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये असं आवाहन करत असते. शिवाय असा कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करत त्यांच्याकडून दंड देखील आकारण्यात येतो.

मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना किती हजारांचा दंड आकारणार आहे. हे समजल्यावर तर तुम्ही रस्त्यावर कचरा टाकताना दहा वेळा विचार कराल. हो कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांविरोधात अतिशय टोकाचं पाऊल उचललं असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून आता ५० हजार रुपयांचा दंड वसूल करणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांना शिस्त लागावी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून पिंपरी-चिंचवड महापालिका १८० रुपयांचा दंड वसूल करत होती. मात्र, आता आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही आधीच्या दंडापेक्षा जवळपास दोनशे टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर सध्या राज्य सरकारने प्रशासक नेमल आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या बैठकीत पालिका प्रशासन तसंच आयुक्त राजेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोना काळात वापरण्यात आलेले मास्क, पीपीई किट्स, गाऊन्ससह अन्य वैद्यकीय उपकरणांमुळे शहरातील कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे आधीच शहरांमध्ये असणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण आणखी वाढल्यामुळे त्याचा त्रास सर्व नागरिकांना होतं होता. कचऱ्याच्या समस्येवर आळा घालण्यासाठी कडक कारवाई व्हावी अशी नागरिकांची इच्छा होती. मात्र, अचानक एवढी मोठा दंड पाहून नागरिकांना धक्का बसला असेल यात शंका नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply