Pimpri Chinchwad Fire : काळेवाडीत 2 कारखान्यांना भीषण आग, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

Pimpri Chinchwad Fire :  पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. आज (साेमवार) सकाळी 10 वाजता काळेवाडी येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती कळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी पाेहचला.

Satara Lok Sabha Election Results : उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली, निकाल घटिका समीप; उत्सुकता शिगेला

ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलिंडरचे स्फोट देखील होत हाेते. आगीचे धूर आकाशात सर्वत्र पसरले हाेते. या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची चर्चा हाेती.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत दाेन्ही कारखानामधील साहित्य जळून खाक झाले. परिणामी खूप माेठे आर्थिक नुकसान झाले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply