Pimpri Chinchwad : घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; १७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Pimpri chinchwad  : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या टोळीकडून पोलिसांनी सोने- चांदीच्या दागिन्यांसह पिस्तूल, काडतुसे असा साधारण १७ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुणे, पिंपरी- चिंचवड (Pimpri chinchwad) शहरात घरफोडी जबरी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी तपस सुरू असताना कुरळी या गावात सुशील उर्फ बारक्या भरत गोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारासह एका घरात देशी पिस्टल सोबत लपून बसला आहे, अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दरोडा विरोधी पोलीस (Pimpri Chinchwad Police) पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून सुशील उर्फ बारक्या गोरे, अक्षय प्रभाकर कणसे, आणि त्याचे दोन अल्पवयीन गुन्हेगार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jharkhand Train Accident : मोठी बातमी! हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस रुळावरून घसरली; अनेक प्रवासी जखमी, बचावकार्य सुरू

यातील चारही संशयितांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात (Crime News) जबरी चोरी, घरफोडी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार रूपये किमतीचे चार देशी पिस्टल, चार काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, दहा लाख 75 हजार किमतीचे सोने - चांदीचे दागिने, चार लाख 85 हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल असा ऐकून जवळपास 17 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply