Pimpri Chinchwad : चिमुकल्यासह आईची अकराव्या मजल्यावरून उडी; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

 Pimpri Chinchwad : विदेशातून घरी परतलेल्या एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह अकराव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना  पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. महिलेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे. 

वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील रिगेला सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना २० एप्रिलला सायंकाळी घडली आहे. कोमल आवटे आणि सोहम आवटे असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाचे नाव आहे. कोमल आवटे या विदेशात गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या घरी आल्या होत्या. दरम्यान २० एप्रिलला त्या रिगेला सोसायटीमध्ये अकराव्या मजल्यावर वास्तव्यास होत्या. दरम्यान त्यांनी सायंकाळी मुळाशी उडी घेतली. 

Manipur Lok Sabha Election : मतदानादरम्यान गोळीबार आणि हाणामारीची घटना, मणिपूरच्या 11 बूथवर 22 एप्रिलला पुन्हा होणार मतदान

मानसिक आजारातून उचलले पाऊल?

 कोमल आवटेला सिजनोफोबिया हा मानसिक आजार झाला असावा; यातून मला कुणीतरी मारणार आहे. माझ्या मागे भूत लागला आहे असं भास होत होते. यातूनच तिने आपल्या मुलासह आत्महत्या करण्यासारखा टोकाचे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply