Pimpri Chinchwad : बनावट जामीनदार हजर करत जामिनावर सुटका; तीन बांगलादेशी झाले फरार

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईत तीन बांग्लादेशींना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांनी बनावट कागदपत्र तसेच बनावट जामीनदार हजर करून कोर्टाकडून जामीन मिळवत सुटका केली. जामीन मिळाल्यानंतर मात्र हे तीन बांगलादेशी नागरिकांनी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.

पिंपरी चिंचवड शहरासह वेगवेगळ्या भागात बांगलादेशी तसेच रोहिंग्यांचे वास्तव्य वाढले आहे. अशा बांग्लादेशींना पोलीस पकडून ताब्यात घेत आहे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन बांग्लादेशींना ताब्यात घेतले होते. यात सम्राट बलाया बाला याच्यासह दोन महिलांचा समावेश होता. दरम्यान या तिघांनी जामिनावर सुटका होण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यानुसार कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली.

 

तारखेवर हजर न झाल्याने सदर प्रकार उघड

दरम्यान कोर्टाने जमीन दिल्यानंतर तिघेजण जामीनावर बाहेर आले. मात्र कोर्टाने दिलेल्या पुढील तारखेला तिघांपैकी कोणीही हजर झाला नाही. यामुळे पोलिसांनी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन तपास केला असता त्याठिकाणी देखील आढळून आले नाही. यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, जामीन मिळविण्यासाठी आणलेले जामीनदार व कोर्टापुढे सादर केलेले कागदपत्र बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

तर सम्राट बलाया बाला याच्यासह दोन महिला असे तीन बांगलादेशी फरार झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या तिन्ही बांगलादेशी आरोपी विरोधात तसेच एक वकील, बनावट जामीनदार आणि बनावट कागदपत्र तयार करणारा व्यक्ती अशा एकूण सहा आरोपी विरोधात न्यायालयाची आणि पोलिस प्रशासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे फरार असून फरार आरोपीच्या शोध आता एमआयडीसी भोसरी पोलीस घेत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply