Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ५००० अनधिकृत बांधकामांवर कारवाई, शेकडो पोलीस तैनात

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड महानगरपालिका चिखली आणि कुदळवाडी परिसरातील जवळपास ५००० अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिखली आणि कुदळवाडी परिसराकडे जाणारे रस्ते चारही बाजूंनी बंद करण्यात आले असून, परिसरात शेकडो पोलीस तैनात आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल जॅमर बसवण्यात आले आहेत.

महापालिकेच्या या कारवाईला व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच कुदळवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिखली आणि कुदळवाडी भागात विविध प्रकारची गोदामे, भंगार दुकाने, आणि व्यवसाय सुरू आहेत. या गोदामांमध्ये राज्यातील तसेच परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत आहेत. मात्र, महापालिकेच्या कारवाईमुळे या व्यवसायांवर संकट ओढावले आहे.

Congress : काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा भोपळा, राजधानीतलं काँग्रेसचं गणित चुकतंय कुठं?

या कारवाईला काही स्थानिक राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. काहींना वाटते की, राजकीय दबावामुळेच महापालिकेने या भागातील अनधिकृत बांधकामांवर कठोर पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या कारवाईमुळे व्यापारी आणि कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक व्यापारांचे मालमत्तेवर होणारे परिणाम आणि रोजगार गमावण्याचा धोका यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

याशिवाय, बंदोबस्तामुळे सामान्य जनतेलाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चिखली आणि कुदळवाडीतील या कारवाईमुळे महापालिकेची कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. प्रशासनाने या कारवाईत काही स्पष्टता दिली नसल्यामुळे व्यापारी वर्ग अधिक नाराज आहे. हा मुद्दा भविष्यात महत्त्वाचे राजकीय व सामाजिक परिणाम घडवेल, अशी चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply