Pimpri Chinchwad Crime : मित्रांच्या मदतीने एकावर जीवघेणा हल्ला; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या रागातून घटना

Pimpri Chinchwad : नातेवाईक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर एका तरुणाने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने मिळून कोयत्याने वार केले आहे. ही धक्कादायक घटना भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील लांडगेनगर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील लांडगेनगर परिसरात घडलेल्या घटनेत भोसरीतील देवकरवस्ती येथील ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान फिर्यादी हा संशयित आरोपीच्या नातेवाईक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. याचा मनात राग असल्याच्या कारणावरून त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादीवर कोयत्याने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक

दरम्यान घटनेत सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून भोसरी पोलिसांनी थेरगाव येथील २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तर त्याच्यासह त्याच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pune -Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, ९ जण जागीच ठार

दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या दोन गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. मौजमजेसाठी दुचाकी वाहन चोरणाऱ्या नवनाथ नरळे याला अटक करत त्याच्या ताब्यातून जवळपास ५ लाख रुपये किमतीच्या ९ दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तर वाईन शॉपचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या मेहताब शेख याला ही वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही कारवाईत वाकड पोलिसांनी दुचाकी वाहन चोरीचे १० आणि घरफोडीचे ३ असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणून जवळपास ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply