Pimpri : चाकणमध्ये मोटार चालकाने दुचाकीस्वाराला नेले फरफटत

Pimpri  : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुंबरेनगर येथे मोटार चालकाने दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. निलेश दत्तात्रय पाटेकर (वय २२, रा. वाकी, खेड), नागेंद्र रामचंद्र प्रजापती (वय २१) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र हे दुचाकीवरून कामावर जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना खुंबरेनगर येथे त्यांच्या दुचाकीला मोटारीला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर मोटार चालकाने निलेश आणि नागेंद्र दोघांनाही काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर मोटार चालक पळून गेला. या अपघातात निलेश आणि नागेंद्र दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

कंटेनरची दुचाकीला धडक, पती-पत्नी जखमी

गोडाऊन चौक मोशी येथे एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. महादेव विश्वनाथ गरड (वय ४५, रा. चऱ्होली बुद्रुक) आणि त्यांची पत्नी सुजाता महादेव गरड (वय ३७ ) अशी जखमींची नावे आहेत. महादेव गरड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : विद्यापीठाकडून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य… भारतरत्न जे. आर. डी. टाटा अर्थसाहाय्य योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव गरड आणि त्यांच्या पत्नी सुजाता गरड त्यांच्या दुचाकीवरून कामावरून घरी जात होते. भोसरी येथून मोशीकडे जात असताना गोडाऊन चौक मोशी येथे कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर सिग्नल तोडून हयगयीने चालवला. कंटेनरने गरड यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महादेव गरड आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई चांदखेड-कासारसाई रोड, मावळ येथे करण्यात आली. ओमकार अनिल राऊत (वय ३८, रा. नेरे दत्तवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन काचोळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड ते कासारसाई रोडवर शिरगाव पोलिसांनी ओमकार राऊत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार १०० रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply