Pimpri : ‘याला पाडा,त्याला गाडा ही कुठली संस्कृती’; पंकजा मुंडे यांचा हल्ला

Pimpri : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षांत समाविष्ट गावांमध्ये अनेक कामे करून दाखवली आहेत. ही कामे केल्यानंतरही केवळ विरोधाला विरोध आणि राजकारणात टिकायचे म्हणून टीका करायची. “याला पाडा त्याला गाडा ही कुठली संस्कृती? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

‘‘अरे जो काम करतो त्याला निवडून आणण्याचा सर्वस्वी अधिकार नागरिकांचा आहे”. काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का? असे सवालही त्यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केला. महायुतीच्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, या सभेला येण्यापूर्वी मी या मतदारसंघाची माहिती घेत होते. माहिती घेत असताना सध्या विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची माहिती मिळाली. मात्र महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या समाविष्ट गावांमध्ये केलेले काम मी पाहिले आहे.

आंब्याच्या झाडाला दगडे मारले जातात

कुणीही कडुलिंब, बाभळीला नाही तर आंब्याच्याच झाडाला दगडे मारतात. पैलवानाने व्यथित होऊन नाही तर बलवान होऊन राजकारण करायचे आहे. बल बुद्धी आणि विद्या हे सर्व काही एका पैलवानाकडेच असते. असा गैरसमज आहे की पैलवानाला फक्त भावना कळतात नव्हे, तर पैलवान कोणत्या वेळेला शरीराचा कोणता स्नायू वापरून शत्रूला चिटपट करायचे हे ठरवत असतो. म्हणून आमदार महेश लांडगे यांनी राजकीय पैलवान होऊन टीकेला उत्तर न देता केलेले काम दाखवत आहेत. त्यामुळे विरोधक चितपट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुंडे म्हणाल्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *