Pimpari Chinchwad : भोसरी पोलिसांची मोठी कारवाई! अट्टल दुचाकी चोरट्यास ठोकल्या बेड्या; तब्बल १६ गाड्या जप्त

Pimpari Chinchwad : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे असं दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच नाव असून, त्याच्या ताब्यातून भोसरी पोलिसांनी चोरीचे 16 दुचाकी वाहन जप्त केले आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, योगेश शिवाजी दाभाडे हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि धुळे ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याने जवळपास 17 मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत.

Kolhapur Loksabha Election : कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपचा मोठा डाव! शाहू महाराज छत्रपतींना समरजितसिंह घाटगे आव्हान देणार?

या प्रकरणात भोसरी पोलीस त्याचा शोध घेत होते. अशातच योगेश शिवाजी दाभाडे हा भोसरीतील गाव जत्रा मैदान या ठिकाणी येणार अशी गोपनीय माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत योगेश शिवाजी दाभाडे याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या ताब्यातून तीन लाख 84 हजार रुपये किमतीची16 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

पुणे शहरातील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बुधवारी गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयत्याने हल्ला करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *