Petrol Pump News : पेट्रोल विक्री बंद राहणार असल्याची राज्यभरात अफवा; वाहनचालक धास्तावले, पंपावर तुफान गर्दी

Petrol Pump News : देशभरासह राज्यात पेट्रोल विक्री बेमुदत बंद राहणार, अशा अफवा सोमवारी (१ जानेवारी) दुपारपासून सुरू झाल्या. रात्रीच्या वेळी तर या अफवांनी आणखीच जोर पकडला. त्यामुळे वाहनाचालकांनी पेट्रोल पंपाच्या दिशेने धाव घेतली. खिशात असेल तितक्या पैशांचे इंधन भरायचे, असा संकल्पच अनेकांनी केला होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती.

केंद्रातील मोदी सरकारने मोटर वाहन कायद्याविरोधात बदल केला. या बदलाचा देशभरातील वाहन चालक संघटनेकडून विरोध करण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व पेट्रोलियम कंपनीच्या टँकर चालकांसह विविध वाहन चालक संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे.

Dhule Crime News : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, गुटख्यासह 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून काही संघटनांनी बेमुदत संप देखील पुकारला आहे. करण्यात येणार आहे. पेट्रोल पंपाला इंधनाचा पुरवठा करणारे वाहनचालक देखील या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यभरात इंधनाचा तुटवडा होणार, अशा अफवा पसरल्या आहेत. 

पेट्रोल विक्री बंद राहणार असल्याच्या पसरताच वाहनचालकांची पेट्रोल भरण्यासाठी ठिकठिकाणी एकच गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर मध्यरात्रीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उल्हासनगरमधील पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी केली होती. रात्री दीड वाजता शहारातील सतरा सेक्शन पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अमरावतीमध्ये देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर लावल्या रांगा लावल्या होत्या. ग्रामीण भागातही पेट्रोल पंप बंद असल्याची माहीती वाढल्याने वाहनधारकांकडून पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. वाहनचालकांनी अचानक मोठ्या प्रमाणात इंधन भरल्याने शहरातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले होते.

नाशिक जिल्ह्यात इंधन तुटवडा होईल या भीतीपोटी येवला शहरात वाहनचालकांनी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. इंधन पुरवठा होणार की नाही या भीती पोटी वाहनधारक रांगेत ताटकळत बसले होते. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, सोलापूर, मुंबई पुण्यासह अनेक शहरात वाहनचालकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली होती.

दरम्यान, पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचं पेट्रोल-डिझेल असोसिएशसने स्पष्ट केले आहे. पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याची संघटनेची कुठलीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply