Pele Passes Away : फुटबॉलचा देव गेला ! ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचे निधन !

Pele Passes Away : क्रिडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांनी तीनवेळा ब्राझील संघाला फिफा विश्वचषक जिंकून दिला होता. १९५८, १९६२ आणि १९७० च्या फिफा विश्वचषक जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते.  पेले यांच्या मुलीने इन्स्टाग्राम पोष्ट लिहून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

पेले यांना नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडत गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या शरीरातील कोलोन ट्यूमर हटवण्यात आला. त्यानंतर कीमो थेरेपी करण्यात आली होती.

याआधी ते अनेकदा रुग्णालयात दाखल झाले होते. पेले यांना हदया संदर्भातील आजार होता. कीमो थेरेपी उपचाराचा काही परिणाम होताना दिसत नव्हता. पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. 

१९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply