Pavana River : पवना नदी पुन्हा फेसाळली, माशांचा मृत्यू; नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Pimpri Chinchwad :  पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसेच मैला मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने पवना नदी पात्रातील माशांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र या नदीत कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असते. यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन नदी फेसाळत असते. यापूर्वी देखील रसायन मिश्रित पाण्यामुळे पवना नदी वारंवार फेसाळली होती. त्यात पुन्हा थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणी पवना नदी पात्र मोठ्या प्रमाणात फेसाळल आहे.

Pune Crime : पुण्याच्या उद्योजकाला ४ कोटींना फसवणाऱ्या 'गुढिया'चं गूढ उकललं, १० महिन्यांपासून होती गायब

याचं ठिकाणी प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला आहे. तसेच नदीपात्रातील इतर जलचर जीवन देखील धोक्यात आले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या गलथान कारभारामुळे पवना नदी पात्रात काही उद्योजक रसायन मिश्रीत तसेच मैला मिश्रित पाणी वारंवार सोडत आहेत. त्यामुळे एकूणच नदीपात्रातील जलचर जीवन आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच आरोग्य देखील धोक्यात आल आहे.

रसायनयुक्त पाणी शहरात

पिंपरी चिंचवड शहर परिसरात असलेल्या कंपन्यांमधून निघणारे घाण रसायनयुक्त पाणी हे नदीत सोडले जात असते. पवना नदीतून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जात असते. अर्थात रसायनयुक्त पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी जात असते. नदीतून जाणारे पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण करून जात असले, तरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply