Patanjali Misleading Ads : जनतेची जाहीर माफी मागणार बाबा रामदेव; केंद्राच्या उत्तरावरही सर्वोच्च न्यायालय नाराज

Patanjali Misleading Ads : योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. रामदेव बाबा यांनी दाखल केलेल्या माफीनाम्यावर आपण समाधानी नसल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांना सुनावलं. रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला होता. यावेळी रामदेव बाबा यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.

बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण जाहीरपणे माफी मागतील, असं वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं. आम्ही बिनशर्त माफी मागत आहोत, जे आश्वसन आम्ही कोर्टाला दिलं होतं. त्याचं पालन आम्ही करू शकलो नाहीत. यावर निकाल देतानासुप्रीम कोर्ट म्हणाले की, तुम्ही कायदा जाणून आहात का? मागील माफीनाम्यात हेरफार करण्यात आला होता.

Arvind Kejriwals : अरविंद केजरीवालांना दुसरा धक्का; वकिलांच्या भेटीबाबतची याचिका फेटाळली

एकीकडे तुम्ही सवलत मागत आहात, तेही माफीनाम्यात हेरफार करून, असं म्हणत न्यायालयाने रामदेव बाबा यांना फटकारलं. मागील वेळी सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना परत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply