Patana Boat Capsizes : गंगा स्नान करायला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; १७ जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Patana Boat Capsizes : बिहारची राजधानी पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगास्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. १७ जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत बुडाली  ११ जणांचे प्राण वाचले. पण ६ जण बेपत्ता झाले आहे. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमकडून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगा दसऱ्याच्या निमित्ताने बिहारच्या गंगा घाटावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गंगा स्नान करण्यासाठी मोठ्यासंख्येने भाविक याठाकिणी येत असतात. अशामध्येच गंगा दसऱ्याच्या दिवशीच पाटण्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भाविकांना गंगास्नान करण्यासाठी घेऊन जाणारी बोट नदीमध्ये बुडाली. १७ जण या बोटीतून प्रवास करत होते. यामधील १७ जणांपैकी काही जण पोहत पोहच नदीच्या काठावर आले तर काही जणांचे प्राण वाचवण्यात स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमला यश आले. १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर ४ जण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. हे चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.

Mount Everest : मंचरच्या तरुणांनी करुन दाखवलं; एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर १७ हजार ६०० फुटांची केली यशस्वी चढाई

घटनास्थळावर रेस्क्यू टीम आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. पोलीस एसडीआरएफ टीमच्या मदतीने गंगा नदीत सर्च ऑपरेशन करत आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. गंगा स्नान करण्यासाठी बोटीतून जात असताना अचानक बोटीचे संतुलन बिघडले. त्यामुळे बोट नदीच्या मध्यभागी पलटी झाली. बोटीतून प्रवास करणाऱ्या काही जणांना पोहता येत होते त्यामुळे त्यांचा बचाव झाला. तर ज्यांना पोहता येत नव्हते ते बेपत्ता झाले आहेत. अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा दसऱ्यानिमित्त बरेज जण रविवारी उमानाथ घाटावर गंगेत स्नान करण्यासाठी आले होते. बोट उलटल्याने एकाच कुटुंबातील 17 जण नदीत बुडाले. यातील 13 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. एसडीआरएफचे पथक ६ बेपत्ता जणांचा शोध घेत होती. यामधील दोघांना वाचवण्यात यश आले. तर चौघांचा शोध सुरू आहे. एनएचएआयचे निवृत्त अधिकारी अवधेश प्रसादही बेपत्ता आहेत. अवधेश प्रसाद महिनाभरापूर्वीच निवृत्त झाले. तर त्याची पत्नी बचावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply