Pashan Sus Road Traffic : पाषाण-सुस रोडवरची वाहतूक कोंडी सुटणार तर कधी ? वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे : पुण्यातील पाषाण सुस रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल (सोमवार, ता. 24) सकाळच्या दरम्यानचा हा व्हिडिओ असून बेकायदा पार्किंगमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये हजारो वाहने अडकून पडली होती. या वाहतुककोंडीमुळे नागरिकांना जवळपास एक तास उशीर झाला आहे.

दरम्यान, "पावसाळ्यामध्ये संपूर्ण सुस गावामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तर येथील रस्त्यांची सुद्धा बिकट अवस्था असताना पुणे महापालिकेला या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात काही रस नसल्याचं दिसून येतंय. येथे झालेली वाहतूक कोंडी काहीवेळा वाहतूक पोलीस हाताळतात पण या रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज आहे. काल झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये नागरिक जवळपास ४५ मिनीटे ते एक तास अडकून पडले होते" अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

Buldhana ST Bus Accident : बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात, ५५ प्रवाशांची बस घाटात उलटली, मदतकार्य सुरू

“24 जुलै रोजी सकाळी पाषाण-सुस रस्त्यावर अवैध पार्किंग, अवजड वाहने रस्त्यावर थांबणे इत्यादी कारणांमुळे 2 ते 3 किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. आता आम्ही वाहतूक सुरळीत केली आहे. आम्ही पाषाण-सुस रोडवर ट्रॅफिक वॉर्डन देखील नियुक्त केले आहेत आणि दररोज वाहतूक सुरळीत राहील याची खात्री केली जाणार आहे.” असं बावधन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply