
Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर सध्या जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत. पुण्याच्या मुंढवा भागातील जमिनीच्या खरेदीमध्ये पार्थ पवार यांनी शुल्क रक्कम कमी दाखवून कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांसंदर्भात जमिनीच्या खरेदीसाठीचं Index II पुरावा म्हणून दिलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भातली काही कागदपत्रंही शेअर केली आहेत. मात्र, यातील इंडेक्स टू मधील काही चुका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अधोरेखित करून सांगितल्या आहेत.
पुण्यातील सदर जमिनीचा खरेदी व्यवहार तब्बल १८०४ कोटींचा असूनही तो कागदोपत्री फक्त ३०० कोटींचा असल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे. खरेदी व्यवहारावरील १२६ कोटींची स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी हा खटाटोप झाल्याचा मुख्य आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, व्यवहार ३०० कोटींचा दाखवून नंतर आलेली २१ कोटींची स्टॅम्प ड्युटीदेखील माफ करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. त्यासाठी त्यांनी काही कागदपत्रंही सादर केली असून त्यातच हा इंडेक्स टू चा कागद समाविष्ट आहे.
|
Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप; पुण्यातील वादग्रस्त खरेदी प्रकरण नेमकं काय आहे? |
या कागदावर जमीन नेमकी कुठे आहे? किती आहे? व्यवहाराचं नेमकं शुल्क किती आहे? व्यवहार करणाऱ्या पक्षकारांची नावं काय आहेत? व्यवहाराची तारीख किती आहे? त्यासाठी किती मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली? अशी माहिती आहे.
यात पक्षकाराचे नाव अमेडिया एंटरप्रायजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील असं आहे. हेच दिग्विजय अमरसिंह पाटील पार्थ पवार यांचे अमेडिया एंटरप्रायजेसमधील भागीदार असल्याचं अंजली दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. मात्र, या कागदावरील काही मोठ्या चुका विजय कुंभार यांनी नमूद केल्या आहेत.
“यात मुंढवा भाग पुण्यातील मुळशी तालुक्यात असल्याचा उल्लेख केला आहे तर अमेडिया एंटरप्राईजेसचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या नावापुढे चक्क स्त्री लिहिलेले आहे. या चुका वरकरणी किरकोळ वाटत असल्या तरी त्या तशा नाहीत. हा मालमत्तेचा विषय असतो. या बाबतीमध्ये छोटीशी चूकसुद्धा मोठा आणि विपरीत परिणाम करू शकते. या विषयाला खूप कंगोरे आहेत”, असं विजय कुंभार यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या कागदावर दिग्विजय पाटील यांचं वयदेखील ० लिहिण्यात आलं आहे!
“मुंढवा भाग पार्थ पवारांच्या सोयीसाठी मुळशी तालुक्यात गेला का? काल पुण्यातील ४० एकर जागेच्या व्यवहाराची बातमी प्रसिद्ध झाली. त्यात इतर मोठे घोटाळे तर आहेतच. परंतु घाई गडबडीत आणि कोणाच्या तरी दबावाखाली काम केले तर कशा चुका होतात हेही त्यातून सिद्ध झालं आहे”, असंही कुंभार यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

